डोंबिवलीत भाजी विक्रेता निघाला सराईत चोरटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी.

डोंबिवली – घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने भाजी विकण्याचे ठरविले.पण त्याला वाममार्गाने जास्त पैसा कमविण्याची चटक लागली. त्यातून त्याने अत्यंत सोपा मार्ग काढत चोरी करून पैसा कमविण्याचे ठरविले. मग भाजी विकण्याच्या बहाण्याने तो नाशिक येथील इगतपुरी येथून कल्याण-डोंबिवलीत यायचा. बंद घराची टेहाळनी करून संधी मिळताच घरफोडी करून निघून जायचा.मात्र इमातीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने मानपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

बबन दशरथ जाधव ( ३९, रा.नाशिक,इगतपुरी ) असे अटक आरोपीचे नाव आहे.डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडीवली –धोकली येथील बंद घराचे टाळे आणि कडी –कोयंटा कटावणीने तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने चोरी करून पळून गेला.मात्र इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि दादाहरी चौरे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) सुरेश मदने, पो.उपनिरीक्षक अनंत लांब, पोलीस हवालदार दामू पाटील,पोलीस नाईक विजय कोळी,मधुकर घोडसरे, संदीप बर्वे, पोलीस शिपाई महेंद्र मंझा, प्रवीण किनरे, संतोष वायकर यांनी बबनला इगतपुरी येथून अटक केली. पोलीस तपासात अटक आरोपी बबनकडून ४ घरफोडी गुन्हे उघडकीस आले. यात गुन्हातील १५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनि हस्तगत केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web