भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप

सोलापूर – संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना सर्व जग ओळखते.बाबासाहेबांचा जय जयकार करणारे सर्वच क्षेत्रात आहेत.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे राजकारण,समाजकारण,आर्थिक समानता व सर्वाना न्याय हे जर समजावून घायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचूनच ते आपल्याला समजतील असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन फ्रंटचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय आवारे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथे गर्दी टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून तेथे जाण्यासाठी होणारा खर्च टाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची व इतर वैचारिक पुस्तके खरेदी करून वाटप करण्यात आली असल्याचे माहिती रिपब्लिकन पीपल्स फ्रंट चे पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय आवारे यांनी दिली.
वैचारिक पुस्तकांचे वाटप मोहोळ येथे डीआरफ चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक नागटीळक व सावित्रा अशोक नागटिळक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंकज नागटिळक,दादा गायकवाड, मदन कुलकर्णी,दत्ताभाऊ मते,बालाजी शेळके,शैलेश कुचेकर,दादाराव जवंजाळ,नितीन चंदनशिवे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्री नागटिळक यांनी केले तर सूत्रसंचालन शैलेश कुचेकर यांनी केले.कार्यक्रमचे आभार दादा जवंजाळ यांनी केले. कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळीत यावर्षी भीमा कोरेगाव ला न जाता बचत झालेल्या पैशांमधून लोकशाही विचारांची पुस्तके सर्वसामान्य नागरिकांना भेट देऊन घरीच एक जानेवारी चा भीमा कोरेगाव शौर्य दिन पुस्तके देऊन साजरा करण्याचे आवाहन रिपब्लिकन पीपल फ्रंटचे प्रदेशाध्यक्ष धनंजय आवारे यांनी केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web