थंडीत मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले, ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकींत २१६६ अर्ज दाखल

प्रतिनिधी.

सोलापूर – मोहोळ तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीपैकी 76 ग्रामपंचायतिच्या निवडणुका लागल्या असून ऐन हिवाळ्याच्या थंडीत गावोगावी राजकीय वातावरण तापले असून 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकुण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 1077 अर्ज आले असून 23 डिसेंबर तारखेपासून अर्ज भरण्यासाच्या शेवटच्या 30 डिसेंबर पर्यंत 2166 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक तहसीलदार राजशेखर लिंबरे यांनी दिली.अर्जाची छाननी 31डिसेंबर 2020 रोजी होणार असून 4 जानेवारी 2021 रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.4 जानेवारी 2021 रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी होणार असून 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी व निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शासनाने काढलेल्या नव्या नियमानुसार ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने मोठी गोची झाली आहे.त्यामुळे पॅनेलची जुळवाजुळव करण्यात पॅनल प्रमुख मग्न झाले असून पॅनल मधील उमेदवाराची कागदपत्रे काढण्यापासून ते डिपाँझिट भरण्यापर्यंत पॅनल प्रमुखाना तारेवरची कसरत करावी लागली आहे.गावातील लोकांचे रुसवे फुगवे पॅनल प्रमुखांना काढावे लागत आहेत.शासनाने काढलेल्या नव्या नियमानुसार सरपंच पदाचा उमेदवार सातवी पास असणे गरजेचे असल्याने गावातील जुन्या राजकीय पुढाऱ्यांची फॉर्म भरण्याची अडचण झाली असून त्यामुळे जाणत्या पुढार्यांनी गावातील आपले नातेवाईक,घरातील शिकलेली व्यक्ती निवडणुकीच्या रिगणात उत्तरीवल्या आहेत.त्यामुळे होवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्त प्रमाणात तरुण चेहरे दिसणार आहेत.
मोहोळ तालुक्यातील काही ग्रामपंचायती बिन विरोध होणार आहेत या फक्त अफवाच ठरल्या आहेत.काही मोजक्याच ग्रामपंचायती बिन विरोध होणार आहेत.तर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे तर काही ग्रामपंचायतीत तिरंगी लढती होणार आहेत.76 गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावागावातील पॅनल प्रमुखांची कसरत पहायला मिळणार आहे.

तालुक्यातील शिंगोली तरटगाव,शिरपूर सो,दादापुर,जामगाव कामती खुर्द,हराळवडी,नांदगाव, विरवडे बु,रामहिंगणी,परमेश्वर पिंपरी, ढोकबाभळगाव,कोरवली,पिरटाकळी, तांबोळे, नजीक पिंपरी, कातेवाड,आढेगाव,टाकळी सिकंदर,वरकुटे, शेजबाभळगाव,सय्यद वरवडे, कुरुल,सौंदणे,बोपले, नरखेड,देगाव वा.,वाळूज, मंनगोळी भैरववाडी,येल्लमवाडी,मसले चौधरी,एकुरके,खंडाळी,पापरी,पेनूर,पोखरापूर,खवणी,पाटकूल,अनगर,कोंबडवाडी,गलडवाडी पासलेवाडी,कुरणवाडी अनगर,खंडोबाचीवाडी,बिटले,घाटणे,वडवळ,कोळेगाव,नालबंदवाडी,वाघोली/वाघोलीवाडी,कोथळे,येणकी,वटवटे,मिरी,घोडेश्वर,अंकोली,औंढी,इंचगाव,आष्टी,देवडी,येवती,तेलंगवाडी,शेटफळ,सिध्देवाडी,चिखली,वडाचीवाडी,हिवरे,भांबेवाडी,लांबोटी,विरवडे खुर्द,शिरापूर सौ,सावळेश्वर,भोयरे,आष्टे,अर्जुनसोड,मुंडेवाडी,पोफळी या 76 गावातील ग्रामपंचायत निवडणूका होत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web