कल्याण ग्रामीण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी २११ जागांसाठी ७२८ उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी.

कल्याण – कल्ल्याण ग्रामीण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या २११ जागांकरीता ७२८- उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्राप्त अर्जाची छाननी ३१  डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १  जानेवारी पर्येंत आहे. कल्याण ग्रामीण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कोरोना ची भीती ओसरली असून निवडणुकीत नागरिकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. तब्बल २११ जागांसाठी ७२८ अर्ज उमेदवारांनी भरले आहेत.

 म्हारळ , वरप, कांबा , रायते , भिसोळ-आणे , गोवेली पिंपोळी, घोटसई, खडवली , इत्यादी २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहे , १५ जानेवारी  मतदान होणार आहे त्यामुळे कल्याण तालुक्यातील वातावरण राजकीय झाले असून ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांना सक्रिय सहभाग असल्याने वॉर्ड मध्ये जिंकण्यासाठी अनेक उमेदवार अर्ज भरून निवडणुकीत चुरस निर्माण करत आहेत .दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून सगळ्य़ांनी निवडणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web