कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती

प्रतिनिधी.

कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने CSR फंडातून बारावे येथे सुरु करण्यात आलेल्या “Plastic to Fuel” प्रकल्पातून 85 लिटर इंधन तेलाची यशस्वी निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पात बाजारात कुठलीही resale value नसलेले प्लास्टिक वापरुन इंधन तयार करण्यासाठी काल चाचणी घेण्यात आली आणि सदर चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून इंधन निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचेकडे महानगरपालिकेने परवानगी मिळणेबाबत अर्ज केलेला आहे.सदर प्रकल्प रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका एकत्रीतरित्या राबवित असून यासाठी लागणारी जागा महानगरपालिकेने पुरविलेली आहे. या प्रकल्पाची क्षमता 1 टन प्लास्टिकची असून त्यातून सुमारे 500 लिटर इंधन तेल तयार होऊ शकते. सदर इंधन तेल बॉयलरसाठी वापरता येणार असून, वाहनांमध्ये त्याचा वापर इंधन म्हणून होऊ शकते का, याची चाचणी सुरु आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आणि मार्गदर्शनाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे व उप अभियंता मिलिंद गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून सदर कामाला गती मिळत असून कचऱ्यातील resale value नसलेल्या व पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टिकचा असाही सदुपयोग यामध्ये होत आहे..

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web