डोंबिवलीतील चौकात झळकले बॅनर, ईडी हा भाजपचा पोपट

डोंबिवली – शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे.त्यावर संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत `ईडी हा भाजपचा पोपट`असे वक्तव्य केले होते.त्यामुळे डोंबिवलीतील शिवसेनेने `ईडी हा भाजपचा पोपट`डोंबिवलीतील मुख्य चौक असलेल्या बाजीप्रभू चौकात बॅनर लावले.हे बॅनर झळकल्याने डोंबिवलीत चर्चा सुरु झाली असून निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

     शिवसेनेचे माजी डोंबिवली शहरप्रमुख तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी बाजीप्रभू चौकात `भाजप पोपट असला तरी मी ईडी चा आदर करतो` असे लिहिलेले बॅनर लावले. मंगळवारी सकाळी लावलेले हे बॅनर पाहून डोंबिवलीकरांमध्ये चर्चा सुरु झाली.एकेकाळी एकत्र येऊन सत्ता उपभोगणारे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करताना पाहून नागरिकांनी डोळ्याला हात मारला. याबाबत डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, सरकारी यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप हे जे राजकरण करत आहे तर लोकशाहीला घातक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशात भाजपचे राजकारण चुकीचे आहे.तर भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, ईडी ही सरकारची स्वतंत्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा कोणाला नोटीस बजावत असेल तर त्याचा भाजपाचा काडीमात्र संबंध नाही. राहिला प्रश्न डोंबिवलीतील बॅनरचा तर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोणाचा पोपट आहे हे जनतेला माहित आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web