रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा आजाद मैदान येथे मोर्चा


प्रतिनिधी.

मुंबई – मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीला राज्य सरकारने १०० कोटी रुपये मंजूर करावे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये दहशत माजविणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी तसेच मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्टायपेंड मुंबई विद्यापीठाने आपल्या तिजोरीतून द्यावी यासाठी आज आजाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित बहुजन विध्यार्थी परिषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे सरचिटणीस सुशील महाडिक, कार्याध्यक्ष ॲड.संदीप केदारे, मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई सरचिटणीस प्रशांत मोरे, मुंबई कार्याध्यक्ष विशाल गायकवाड दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष रुपेश भालेराव,भायखळा तालुका अध्यक्ष शिरीष चिखलकर, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष धम्मदीप बनसोडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष नागसेन सूर्यवंशी , धर्मराज ब्राह्मणे, उत्तर मुंबई अध्यक्ष सुरेश टिके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web