प्रतिनिधी.
सोलापूर – या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी तुरीचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे सध्या तुरीची काढणी सुरू आहे त्यामुळेच
शेतकरी तुर विक्री साठी बाजारत आणत आहेत
तुरीचा हमिभाव 6000 रु प्रती क्विंटल आसताना व्यापारी 4800 ते 5200 रु प्रती क्विंटल एवढ्या कमी दराने खरेदी करित आहेत कोरोना, अतिवृष्टी मुळे शेतकरी आगोदर आडचणीत आसताना व्यापारी शेतकऱ्यांना आधिक आडचणीत आणत आहेत त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा व योग्य भाव मिळण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरवठा करुन तात्काळ तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करावी अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवाजिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी जिल्हा निबंधक सोलापूर याना निवेदन द्वारे केली यावेळी युवाजिल्हाध्यक्ष विजय रणदिवे , दिनेश शिंदे, राहुल चव्हाण, महादेव शिंदे उपस्थित होते