बापूसाहेब आडसुळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

प्रतिनिधी.

सोलापूर – मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथील मुख्याध्यापक बापूसाहेब आडसूळ यांना कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर ज्ञानविद्या गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श व कृतिशील मुख्याध्यापक मिळल्याबदल नामदेवराव भालशंकर गौरव समिती सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष अस्मिता कांबळे व पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर,राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड,उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष शिवदास गुरुजी,जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर,म्हैसगावचे सरपंच पंडित खारे इत्यादी उपस्थित होते
सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर या संस्थेच्या मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथे बापूसाहेब आडसूळ मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले असून त्यांच्या या पुरस्कारामुळे विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यांचे विशेष कौतुक होत आहे त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून एक विद्यार्थी प्रिय व शिक्षक प्रिय व शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून ते आज कार्य करत आहेत एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून काम करत करत ते श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व सार्थक बहुद्देशीय समाजसेवी संस्था,सल्लागार सदस्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या माध्यमातूनही ते सतत कार्य करत असतात.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web