उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन

प्रतिनिधी.

उल्हासनगर – उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा तर्फे महिला मुक्ती दिनाच कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रामुख्याने अनेक महिलांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक महिलांनी व‌ राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रेखाताई ठाकुर यांनी जमलेल्या समुदायाला मनुस्मृती दहन या दिवसाचं महत्व पटवून दिले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मायाताई कांबळे यांनी जमलेल्या सर्वाचे महिला चे आभार मानले.तसेच मायाताई कांबळे यांच्या हस्ते आशा कामगार महिलेचे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले . यावेळी शहर अध्यक्ष रेखाताई उबाळे, शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे, नगरसेविका कविता बागुल , मिरा भाईंदर शहर अध्यक्ष सलिम खान , सचिव रेखाताई कुरवारे, उपाध्यक्ष रंजनी आगळे, ‌अल्काताई तायडे , भिवंडी शहर मिरा मते पालखर जिल्हा अध्यक्ष रेखाताई अवचरताई ,मीना सोरटे ,अमिताताई दरास्तेकर,शमा शेख, भाग्यश्री गायकवाड,बीर आर पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता रनपिसे यांनी केले .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web