कल्याण मध्ये सापांचा मानवीवस्तीत शिरकाव, सर्पमित्राकडून ५ सापांना जीवदान

प्रतिनिधी.

ठाणे – गेल्या ८ दिवसापासून हवामानातील बदलावामुळे कडाक्याची थंडी पडल्याने सर्वानाच गरम उब जशी पाहिजे तशीच उब मुक्या प्राण्यांना आवश्यकता असल्याचे मानवीवस्ती शिरलेल्या विषारी – बिन साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटनेवरून दिसून आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरातील मानवीवस्तीतुन ४ तर कल्याणच्या रेल्वे लोकोशेड मधून १ असे ५ विषारी – बिन विषारी साप सर्पमित्रांने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.

भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी ..

नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडी पासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत असतानाच खडकपाडा परिसरात असलेल्या नीलकंठ पार्क सोसायटीतील एक रहिवाशी काल सकाळच्या सुमारास आपली दुचाकी काढण्यासाठी पार्किंग गेले असता भलामोठा साप सोसायटीच्या आवारात शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबें यांना दिली. सर्पमित्र दत्ता यांनी या सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून बिन विषारी आहे.

विषारी घोणस साप रेल्वेच्या लोकोशेड मध्ये तर दुसरा पडवीत

दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका घराच्या पडवीत विषारी साप शिरल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले, हा साप ५ फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अश्या घोणस जाती आहे. तिसऱ्या घटनेत कल्याण रेल्वे लोकोशेड मध्ये विषारी साप शिरल्याची माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले, हा साप ४ फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अश्या घोणस जाती आहे.

एक साप मातीच्या ढिगाऱ्याखाली तर दुसरा पुस्तकाच्या कपाटात

चौथ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर खोदकाम करताना मजुराला भलामोठा साप अर्धवट मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला दिसला. त्याने याची माहिती मालकाला दिली. त्यांनतर मालक भोईर यांनी सर्पमित्र वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. हा साप असून ६ फूट लांबीचा असून धामण जातीचा आहे. पाचव्या घटनेत मैत्रीकुल आश्रमच्या एका पुस्तकाच्या कपाटात आश्रमातील विध्यार्थी पुस्तक घेण्यसाठी गेला असता त्याला भलामोठा साप कपाटात दडून बसल्याचे दिसला. त्याने या घटनेची माहिती आश्रमातील इतर विध्यार्थाना दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यांनतर घटनेची माहिती सर्पमित्र दत्ता यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कपाटात दडून बसलेल्या साडे सहा फुटाच्या सापाला बाहेर काढले . साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला हा साप धामण जाती आहे.

निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान

या पाचही विषारी – बिन विषारी सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून जंगलात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. मात्र हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास वार संस्थेच्या सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे अहवान करण्यात आले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web