डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी

प्रतिनिधी.

सोलापूर – सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citzan of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी रिपब्लिकन पिपल्स फ्रंटचे राज्य अध्यक्ष धनंजय आवारे यांनी निवदेनाव्दारे केली आहे.
मागणीचे निवेदन नायब तहसिलदार यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सेतू कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रीयत्व आदिवास दाखला देण्यात येतो.तो दाखला नागरिकांना व्यवस्थित वाचता येत नाही.सरकारकडून जे भारतीय नागरिकास राष्ट्रीयत्व आदिवास प्रमाणापत्र दिले जाते.त्या प्रमाणपत्रावर आपल्या भारत देशाचे नाव वाचता येईल असे असावे.ते नाव सध्या मिळणार्या प्रमाणपत्रावर वाचता देखील येत नाही.ते नाव शोधावे लागते.तरी प्रमाणपत्रावरील INDIA व Citizan of india ही अक्षरे गडद व मोठी करावेत.जेणेकरून आपल्या राष्ट्राचे नाव उठावून दिसेल.राष्ट्रीयत्वाचा दाखला नागरिकां जवळ कायम स्वरूपी असणार आहे आणि मिळणारे प्रमाणपत्र त्या नागरिकास राष्ट्रीयत्वाची जाणीव करून देणारे आहे.त्यामुळे प्रमाणपत्रावरील मजकूराच्या शब्दाचा आकार वाढवण्यात यावा.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शैलेश कुचेकर,दादाराव जवंजाळ,सचिन गवळी,नितिन चंदनशिवे,अविनाश साळवे आदि उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web