कल्याणात इंग्लंडहून आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, गर्दी टाळण्याचे केडीएमसीचे आवाहन

प्रतिनिधी.

कल्याण – इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नविन विषाणू स्ट्रेन दिसुन आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत 20 नागरिकांचे RT- PCR swab घेण्यात आले,त्यापैकी एका नागरिकाचा NIV मुंबई येथे पाठविण्यात आलेला RT -PCR चाचणीचा अहवाल positive आला असून सदर नागरिकाची प्रकृती स्थिर असून त्यांस इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. सदर नागरिकास विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.या नागरिकाचा चाचणी अहवाल जनुकिय रचनेच्या तपासणीसाठी NIV मुंबई येथून NIV पुणे येथे पाठविण्यात आला आहे.तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की सलग जोडून आलेल्या सुट्ट्या आणि येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, घराबाहेर फिरताना न चूकता मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे आणि काही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web