प्रतिनिधी.
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांनी जारी केले संचार बंदीचे आदेश .आज रात्री पासून ते ५ तारखेपर्यत हे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू असतील.२३ डिसेंबर ते ५ जानेवारी या दिवसां मध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घरा बाहेर पडण्यास परवानगी असेल, विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटार सायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम १८८ द्वारे कारवाई केली जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण व ३१ डिसेंबर साध्या पद्धतीने व घरीच साजरा करावा. असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांनी केले.
घराच्या बाहेर, इमारतीच्या गच्चीवर साजरे होणारे खाजगी समारंभ कोठेही रात्री ११ नंतर बाहेर येण्यास कार्यक्रम करण्यास मनाई असेल. तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यास, क्रीडा स्पर्धा ,हॉटेल आस्थापना,पब, क्लब, रिसॉर्ट इत्यादी सुरू ठेवण्यास मनाई असेल..वैद्यकीय सेवा पुरवणारे आस्थापना,अत्यावषक सेवा बजावणारे, अत्यावषक किंवा तातडीची वैद्यकीय गरज पुरवणारे तसेच उदा दूध -भाजीपाला यांची वाहतूक ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण डोंबिवली,भिवंडी शहर,अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर असे सर्व महानगर पालिका क्षेत्र येतात