प्रतिनिधी.
सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या विविध सात कमिटीच्या निवडणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मध्ये विविध सात कमिटी सभापति पदाच्या निवडणूक आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक गणेश पुजारी यांनी भारतीय जनता पार्टीचे अविनाश बोमड्याल यांचा पराभव करुन मंडई व उद्यान समितीचे सभापती म्हणून निवडून आल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोषीत केले.
यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा ला पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून गुलालाची उधळण करत जल्लोष केला. या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नगरसेवक गणेश पुजारी यांचे मंडई व उद्यान समिती सभापती निवड झाल्याबद्दल नगरसेवक गणेश पुजारी यांचा सत्कार केला. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर विभागाचे जिल्हा अध्यक्ष नाना कदम, जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, युवा नेते गौतम (महाराज)चंदनशिवे, शिवाजी(अप्पा) बनसोडे, अविनाश भडकुंबे,चाचा सोनवणे,शेरा मोकशी,विजय बमगोंड़े,सुहास सावंत,जयराज सांगे,भिमा मस्के, चिंटू कांबळे धनजय तिर्थकर ,अमर गुरव,वैभव कारंडे,अमोल बनसोडे,रामा सर्वगोड ईत्यादी कार्यकर्त उपस्थीत होते.