संत गाडगेबाबाच्या विचारानेच स्वच्छता करण्याची प्रेरणा, तरुणांनी श्रमदानातून केली स्वच्छता

प्रतिनिधी.

सोलापूर – माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे असा महान विचार देणारे अज्ञान ,अंधश्रदा ,आणि अस्वच्छता बद्दल जागरूकता निर्माण करणारे थोर समाज सुधारक ग्रामसुधारनेचे जनक संत गाडगेबाबा यांचे पुण्यतिथी निमित्त महाकालेश्वर मंदिर येथे त्यांना आभिवादन करण्यात आले.
संत गाडगेबाबा यांचे पुण्यतिथिती निमित्त तरुणांनी एकत्र येऊन घाटणे रोडची स्मशानभूमी श्रमदानातून स्वछ केली.स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता ,घाण पाण्याचे नियोजन ,केले तसेच कचरा, काटेरी झुडपांनी बुजून गेलेला परिसर होता.जिकडे तिकडे चिलारी उगवल्याने सर्वत्र घाण असल्याने कोणाचे मयत घेऊन गेल्यावर तेथे चार माणसांना उभारण्याएवढी सुद्धा जागा नसायची लोक लांब रोडवरच थांबायचे हा अनुभव प्रत्येक वेळेस यायचा परंतु स्मशानामध्येच चर्चा व्ह्याची नंतर लोक विसरून जायचे.खरेतर नगरपालिकेने या स्मशानभूमीची स्वच्छता ठेवणे गरजेचे असून देखील गेल्या पाच वर्षांपासून एकदाही स्मशानभूची स्वच्छता केलेली नाही.हि बाब नागरिक वारंवार बोलून दाखवत होते. व त्यांची गेल्या कित्येक दिवसापासून मागणी होती.
नागरिकांच्या मनातील खंत लक्षात घेऊन राहुल तावसकर व अमोल महामुनी सह तरुणांनी घाटणे रोडच्या स्मशानभूमीसह परिसरातील ,चिलारी ,बाभळीचे काटेरी झुडपे सह स्वच्छता केली.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे पाणी पसरल्याने नागरिकांना घाण पाण्यातूनच नाईलाजाने जावे लागत असे.सध्या स्मशानभूमीतील विदुत लाईट बंद आहे.प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे नागीकामधून बोलले जात आहे.तरुणांनी श्रमदानातून स्मशानभूमीची स्वछता करून समाज समोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे महिला वर्गातून बोलले जात होते.तरुणाच्या या कार्यातून येणाऱ्या पिढीला स्वच्छते बद्दल स्वच्छते कडून समृद्धीकडे हि संकल्पना रुजली जाणार असल्याचे तरुणांना आनंद झाला आहे अशी भावना व्यक्त केली.
या वेळी आश्रम नसीर मोमीन राहुल तावासकर ,अमोल महामुनी ,उमेश गोटे ,राजेंद्र बोराडे,संजय स्वामी ,संदीप दीक्षित ,विकास गोटे ,मोहोन पिलीवकर ,अंबादास पवार ,कुंडलिक चव्हाण ,दादा बोराडे ,सदाशिव गवळी ,धनंजय गोटे ,विठोबा कोळी ,भारत गोटे ,संस्कार महामुनी ,कार्तिक तावसकर ,अतिश गायकवाड ,आदित्य अष्टुळ,अभिजीत पिलीवकर ,जितेंद्र तूपसमिंदर आदी मान्यवर उपस्थित होते. तूपसमिंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web