टिटवाळा बल्याणीत विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी.

टिटवाळा – विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे। मुशीर खान शाहिद खान (वय 26) असे त्या दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव होतं. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे पुढील तपास सुरू आहे . महावितरणच्या टिटवाळा विभागात तो कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता.काल रात्री ८  वाजल्यापासून बल्याणी , उंभरणी ,मानिवली,मानिवली पाडा इत्यादी परिसरातील विद्युत सेवा खंडित झाली होता. त्या विद्युत सेवा पूर्ववत करण्याचे काम रात्रीच्या दरम्यान सुरू होते. अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने जोराचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून त्याचे शव शवविच्छेदन करण्यासाठी कल्याणच्या रुख्मिणीबाई इस्पितळात नेण्यात आले आहे.मुशीर खान याच्या अश्या दुर्दैवी मृत्यू मुळे महावीतरणसह संपूर्ण बल्याणी परिसरात दुखाचे सावट पसरलेले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web