महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण

प्रतिनिधी.

ठाणे – जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी केली जाते.परंतू प्रत्येक वेळेस ती शास्त्रीय पद्धतीने होतेस असे नाही. ही बाब लक्षात घेऊन महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील महिलांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.

दहा दिवशीय मोफत प्रशिक्षण शिबिरात महिला आर्थिक विकास महामंडळ पुरस्कृत महीला बचत गटातील तब्बल ५० महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या १० दिवसीय अभ्यासक्रमात आरसेटी मार्फत भाजीपाला लागवड विषयी संपूर्ण प्रशिक्षण देऊन उद्योग व्यवसाया करिता लागणारे भांडवल या करिता संपूर्ण शासकीय योजनांची माहिती व बँकेच्या कर्ज योजना विषयांचे ज्ञान प्रशिक्षण दरम्यान देण्यात आले. यावेळी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचे संचालक विवेक निमकर , जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),अस्मिता , महाराष्ट्र ग्रामीण बँक, म्हसाचे शाखा प्रबंधक योगेश लोहकरे , महाबँक आरसेटीचे प्रशिक्षक अलका देवरे , यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्नेहल खंडागळे , प्रकाश नाईक तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका समन्वयक करुणा व त्यांचे सहकारी समारोप समारंभ व प्रमाणपत्र वितरणाला उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web