सोलापूर ग्रामीण वन्यप्राण्याचा कुत्र्यांच्या पिल्लांवर हल्ला,तरस की बिबट्या नागरिकात भीती

प्रतिनिधी.

सोलापूर – मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील रजनिश कसबे यांच्या घराच्या अंगणात वन्यप्राण्याने रात्रीच्या वेळी प्रवेश करून दोन कुत्र्यांच्या पिल्लांना मारून खाल्ले आहे तर एक पिल्लू तोंडात घेवून पळाल्याचे प्रत्यक्षदर्शी रजनिश कसबे यांनी सांगितले.मात्र लोकांत बिबट्या आहे की तरस याबाबत संभ्रमता निर्माण झाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

मागील काहि महिन्यात बिबट्याने मोहोळ तालुक्यात दहशत निर्माण केली होती.त्याने अनेक जनावरांना फङशा पाडला होता.त्यामुळे लोकांत भिती पसरली आहे.रजनिश कसबे यांच्या घरासमोरील अंगणात रात्री दीडच्या सुमारास वन्यप्राण्याने प्रवेश करून दोन कुत्र्यांची पिल्ली फस्त केली आहेत.कुत्र्यांच्या भुकंण्याचा आवाज आल्याने घरमालक रजनिश कसबे जागे झाले असता वन्यप्राणी कुत्र्याची पिल्ले खात असल्याचे दिसले.ओरडाओरडा केल्याने वन्यप्राण्याने त्या ठिकाणाहून पळ काढला.पळून जात असताना त्यांने तोंडात एक कुत्र्याचे पिल्लू पळवून नेहले.कुत्र्यांची पिल्ली फस्त केलेल्या ठिकाणी रक्त व मांसाचे तुकडे पडले होते.वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे मोठे असून तो कोणता वन्य प्राणी होता याबाबतही संभ्रता आहे.
मलिकपेठ गावातील काही घराच्या अगंणात ही या वन्यप्राण्याने प्रवेश केल्याचे नागरिक सांगत आहेत.सिमेंटच्या रस्त्यावर रक्ताचे डाग पडले होते.मलिकपेठ गावचा परिसर सिना नदिचा काठचा असल्याने शेतकर्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने वन विभागाने या वन्यप्राण्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

सचिन कांबळे,वनसंरक्षक अधिकारी,मोहोळ याच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी सागितले की वन्यप्राण्याने रात्रीच्या वेळी हल्ला केला असल्याने कोणता वन्यप्राणी होता हे सांगता येत नाही परंतु तो तरस किंवा लाडगा असू शकतो.लोकांनी घाबरून जावू नये.सतर्कता बाळगून योग्य ती काळजी घ्यावी.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web