महसूल प्रशासनाच्या गैरकारभारबाबत नदी पात्रात शिवसैनिकांचे जलसमाधी आंदोलन

प्रतिनिधी.

सोलापुर – मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांच्या मुळावर उठलेला अवैद्य वाळू उपसा त्वरित बंद करण्यात यावा.नदी प्रवण क्षेत्रातील पोलिस कर्मचारी व महसूल कर्मचारी यांची त्या त्या सजातून तात्काळ बदली करण्यात यावी.अवैद्य वाळूची हप्ते वसुली करणारा कोतवाल यांची तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.वाळू उपसा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या वाळू तस्करांवर तडीपाराची कारवाई करण्यात यावी यासाठी मोहोळ शिवसेना शहर प्रमुख विक्रम देशमुख यांनी मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे सिना नदी पात्रात शिवसैनिकांसह जलसमाधानी आंदोलन केले.यावेळी शिवसैनिकांनी महसूल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या निवेदन म्हटले आहे की,मोहोळ तालुका जि.सोलापूर येथील भिमा व सिना नदी पात्रातून वाळू तस्कर रात्रीच्या वेळी ट्रक्टर यारी च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैद्य वाळू उपसा करीत असून पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन या प्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई करीत नसल्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेचा अपहार शासकीय यंत्रणाच करीत आहे.हे येथे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे.विशेष म्हणजे पर्यावरण विभागाने सिना नदी पात्रातील उत्खननास पूर्णपणे बंदी घातलेली आहे.तरीही मोठ्या प्रमाणात होणार्या बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे नदी पात्रा लगतच्या शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच मोहोळ तालुका नेहमीच दुष्काळी म्हणून गणला गेला आहे.सिना व भिमा नदीतून अनेक शेतकर्यांच्या शेती सिंचनासाठी विद्युत पंपाव्दारे पाईपलाईन केलेल्या असल्याने नदी पात्रातील वाळू उत्खनन केल्यास नदीतील व भूभागातील पाणीसाठा कमी होवून शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार आहे.या अवैद्य वाळू उपसा प्रकरणी तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी यापूर्वी महसूल व पोलिस प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केलेल्या आहेत.तरीही वाळू तस्करांबरोबर संगणमत करून व पैशाची लाच घेवून सरकारी यंत्रणा या अवैद्य वाळू उत्खननास पाठीशी घालत आहेत.ढोकबाभळगाव येथील कोतवाल, कर्मचारी व संबंधित सजाचे मंडल अधिकारी हे वाळू तस्करांशी निगडीत पैसे घेवून अवैद्य वाळूची महसूल विभागाची बेकायदेशीरपणे लाखो रूपयांची वसूली करीत आहेत.
मोहोळ तालुक्यातील नदी पात्रातील होणारे अवैद्य वाळू उत्खनन त्वरित बंद करून संबंधित वाळू तस्कर,वाळू तस्करीत वापरली जाणारी वाहने,साधने यांच्यावर कायदेशीर कारवाई कारवाई करून ७/१२ व ८ /अ उतारा या स्थावर मालमत्तेवर बोजे चढवण्यात यावेत.तसेच शासनाच्या मालमत्तेची संगणमताने कट रचून लूट व अपहार केले प्रकरणी संबंधित महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या पगारीतून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी.यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी निवेदन स्वीकारले.
या प्रकरणी योग्य ती कारवाई नाही झाल्यास संबंधित शेतकरी व शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने करण्यात येतील असा इशारा मोहोळ शहर शिवसेना प्रमुख विक्रम देशमुख यांनी दिला आहे.
या आंदोलनात शाहू बरकडे,अक्षय नागटिळक,विकास वाघमोडे,ॠषिकेस गोडसे,जयपाल पवार,देवानंद सोनटक्के,दिनेश चव्हाण,समाधान वाघमोडे,राकेश आदलिंगे,गणेश चौधरी,गणेश वाघचवरे,योगेश मोटे,दादा खरात,किरण वाघमोडे,मल्हारी सुरवसे,आकाश गायकवाड,भैय्या आंडगे,किरण पोपळकर,अमिर शेख,सुमित पवार,सोनू शिंदे,समाधान खंदारे,केशव वाघचौरे,रवी खरात,युवराज बंडगर,आण्णा इंगळे,लहू वाघचौरे,आण्णा येळे,करण अष्टूळ सचिन अष्टूळ आदि पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web