प्रतिनिधी.
कल्याण- कल्याणात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रताप केला आहे. गरीब नागरिकांना दुप्पट पैसे करण्याचे आमिष देऊन करोडो रुपयाची लुट केली आहे. कल्याण महिला शहर अध्यक्ष रेखा जाधव सर्वसामान्य नागरिकांना दुप्पट रुपये करण्याचे आमिष देऊन करोडोचा आर्थिक फसवणूक केली आहे. त्यात तीन पदाधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. तब्बल पाच वर्षे हे प्रकरण भाजपची राज्यात सत्ता असल्याने कुठलीही कारवाई होत नव्हती. हे प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे गेल्याने ठाणे पोलीस आयुक्त यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात चौघांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे आणि त्यातील दोन आरोपींचा तात्काळ अटक केली आहे .
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या चंद्रप्रभा ढगले या महिलेच्या तक्रारीवरुन कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याणमध्ये राहणारा रेखा जाधव , श्रीकांत राव,संदीप सानप, आणि सुनिल आव्हाढ या चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांवर आरोप आहे की, त्यांनी संगनमत करुन काही महिलांकडून एक कोटी ७० लाख रुपये घेतले. १८ महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हे पैसे घेतले गेले. कोणाला कडून २० लाख, ३० लाख रुपये असे करुन एक कोटी ७० लाख रुपये घेतले गेले आहेत. या चौघां विरोधात काही महिन्यापासून तक्रार देण्यात आली होती. मात्र पोलिस तपास योग्य पध्द्तीने करीत नव्हते. असे या प्रकरणात दिसून येत आहे. सामान्यान कडून या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे मागणी होत आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा पुढाकाराने अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विकास लवांडे यांचे म्हणणे आहे की, पाच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबीत होते. गृहमंत्र्याकडे या प्रकरणी पाठपुरावा केल्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. गोरगरीब महिलांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस योग्य रितीने तपास करतील असा विश्वास आहे. ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे यावे. भारतीय जनता पार्टीने लूट करणारे कार्यकर्ते समाजात फेरले असतील तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप पदाधिकारी आणि अध्यक्ष यांना अटक झाल्याने याचा परिणाम निवडुकीच्या मतदानावर होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हा व्यवहार ७ ते ८ कोटीच्या वर असल्याची शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. श्रीकांत राव यांनी पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून पैसे घेतले. जेव्हा कधी महिला पैशाची मागणी करायच्या तेव्हा त्या महिलांना पोलिस ठाण्यात जाण्याचे धमकी द्यायचे. अध्यक्ष रेखा जाधव त्यांची समजूत काढून त्यांना थांबवायची. दरम्यान भाजप पदाधिकारी यांच्या ठकसेनगिरी मुळे भाजप पक्षाची जनसामन्यात मोठी नाचक्की झालीआहे.