प्रतिनिधी.
शहापूर – वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी रमेश घेगडे पाटील यांची निवड झाली आहे. या बाबतचे पत्र दिनाक ११ डिसेंबर २०२० रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची सही असलेले नियुक्ती पत्र देऊन ठाणे जिल्हाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
घेगडे पाटील हे शहापूर येथे राहत असून गेले ३२ वर्ष आंबेडकरी चळवळीत काम करीत आहेत. या आधी त्यांनी पक्षाची विविध पदे भूषवली आहेत. वंचित बहुजन आघाडीची स्थापना होण्यापूर्वी त्यांनी भारीपच्या भिवंडी लोकसभा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळली होती. त्यांनी शिवशाहू, फुले, आंबेडकर चळवळीत आपली चागलीच ओळख निर्माण केली आहे. त्याच बरोबर आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्याची ओळख आहे. ११ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली या वेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी रमेश आण्णासाहेब घेगडे पाटील याच्या कडे सोपविण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी घेगडे याच्या निवडीचे स्वागत केले आहे.
