वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुलुंड तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन

प्रतिनिधी.

मुंबई – लॉकडाउनच्या काळात केंद्र शासनाने आपल्या संख्या बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक मंजूर करून घेतली. ही बिल शेतकरी वर्गासाठी घातक असून शेतक-याना देशोधडीला लावण्याच काम हे सरकार करत आहे.म्हणूनच हे विधेयक रद्द करण्यासाठी पंजाब, दिल्ली तसेच देशभरातील शेतकरी ठिय्या मांडून आहे. तसेच ह्या केंद्र सरकारने रेल्वेच खाजगीकरण करून भांडवलदारांचे खिसे भरण्याच कारस्थान सुरू केलं आहे. ह्या खाजगीकरणा मुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मालाची वाहतूक करन फार खर्चिक होईल त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्वे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्त्वात मुलुंड तहसीलदार कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात वंचित च्या कार्यकर्त्यांनी भाजीच्या जुड्या व ऊस हातात घेउन तहसील कार्यालयासमोर ठीय्या मांडला.तसेच वंचित तर्फे तहसील अधिकार्याला निवेदन देण्यात आले.या आंदोलनाला वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश महासचिव शुभलक्षमी ताई सावंत, मुंबई प्रदेश आयटी प्रमुख स्नेहल ताई सोहनी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षा सुनीता ताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अरुणा ताई सावंत, जिल्हा महासचिव वनिता ताई कांबळे, मुलुंड तालुका अध्यक्ष राहुल दादा जाधव, महिला अध्यक्षा अर्चना ताई मिसले, भांडुप ता. अध्यक्ष विश्वास दादा सरदार, भांडुप ता. अध्यक्षा अनिता ताई कांबळे, विक्रोळी ता. अध्यक्ष चेतन दादा अहिरे, विक्रोळी वॉर्ड क्र. ११७ चे अध्यक्ष रवी दादा रेड्डी, शिवाजी नगर ता. अध्यक्षा शारदा ताई गायकवाड, घाटकोपर (प) ता. अध्यक्ष बिपिन दादा गायकवाड, घाटकोपर (पू) ता अध्यक्ष देविदास दादा आहिरे तसेच इतर पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web