खा.किरीट सोमय्या यांच कल्याण तहसीलदार यांना निवेदन, प्रताप सरनाईक यांच्या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण डोंबिवली  महापालिका निवडणुकीत जसजशी जवळ येते असून राजकारण ही तापू लागले आहे . त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला लक्ष करण्यासाठी भाजप नेते मैदानात उतरले आहे प्रताप सरनाईक यांनी टिटवाळ्यात ७८ एकर जमीन खरेदी केली आहे इ डी चौकशी सुरू असल्याने या प्रकरणी ही चौकशी करावी म्हणून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कल्याण तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली त्यावेळी कल्याण डोंबिवली मधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकत्यानी गर्दी केली होती 
कल्याण  तहसीलदार कार्यालयात गुरुवारी दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट देऊन टिटवळ्यातील सन २०१४  रोजी टिटवाळ्यातील ११२ सातबऱ्यांची चौकशी  करण्याची मागणीचे निवेदन तहसीलदार दीपक आकडे  यांना दिले आणि कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी  प्रताप सरनाईक यांच्या वर टीका करत मुख्यमंत्र्या नी ही या प्रकरणात लक्ष घालावे असा टोला ही मारला. यावेळी पालिकेच्या निवडणूक जवळ आल्याने भाजप पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली होती आणि शिवसेनेला लक्ष करण्याचा प्रयत्न एकातरीत  दृश्य बघितल्यावर दिसून येत होते यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार , प्रेमनाथ म्हात्रे , राजाभाऊ पातकर, आणि माजी नगरसेवक नगरसेविका , पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web