शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वंचितच्या वतीने ठाण्यात धरणे आंदोलन

प्रतिनिधी.

ठाणे – केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेती संबधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत असलेल्या संख्या बळाच्या आधारावर मंजुर करुन घेतले.या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशः नागवला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे. जागतिकिकरण आणि त्याचमागून अपरिहार्यपणे येणा-र्या खाजगीकरणातुन शेतक-र्याचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतक-र्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे.अशा या अन्याकारक विधेयकाचा निषेध नोंदवित व या विधेयकाला विरोध म्हणुन दिल्ली येथे गेले अनेक दिवस शेतकरी बाधवाचे आंदोलन सुरु आहे . या आदोलानाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना धरणे आंदोलन करण्यासाठी आदेश दिला होता त्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनिल भगत व महिला जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. व ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला ठाणे जिल्हा सचिव रेखा कुरवारे , महासचिव जयवंत बैले,वी.प्रधान, भिमराव गायकवाड ,ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अंभोरे ,सुनिता रनपिसे ,मीना सोरटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web