भिवंडीत फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

प्रतिनिधी.

भिवंडी – शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती असलेल्या पिराणी पाडा या ठिकाणी फरार आरोपीस पकडण्यासाठी आलेल्या नवघर वसई येथील पोलीस पथकावर आरोपीच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तींनी हल्ला करून आरोपींना घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार भिवंडीत घडला आहे .धक्कादायक बाब म्हणजे या हल्ला करणाऱ्यां मध्ये महिलांचा सुध्दा समावेश होता .
वसई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद कमरअली जाफरी व यदुल्ला कमरअली जाफरी हे भिवंडी शहरातील पिराणी पाडा येथे असल्याची माहिती मिळाल्याने नवघर पोलीस ठाण्याचे पथक सदर वस्तीत फरार आरोपींच्या शोध घेण्यासाठी येऊन या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असता तेथे असलेले आरोपीचे नातेवाईक मोहम्मद जमाल सर्फराज जाफरी ,मोहम्मद सज्जाद जाफरी, सादक कमरअली जाफरी ,कुपक कमरअली जाफरी ,शमा कमरअली जाफरी व इतर तीन महिलांनी पोलिसांना आरोपी यांना घेऊन जाण्यासाठी अटकाव करीत त्यांच्यावर दगडफेक करीत लाकडी मारदंडा याने पोलीस पथकवर हल्ला केला यात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या हाताला दुखापत झाली परंतु पोलिसांनी दोन्ही आरोपींना या जमावातून आपल्या ताब्यात घेतले व त्या बाबत शांतीनगर पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या बाबत गुन्हा दाखल केला आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web