आ.किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात, घटनेत दुचाकी स्वार तरुण, तरुणी ठार

कल्याण – आपटी आणि दहागाव दरम्यान रविवारी  सांयकाळी आमदार यांची गाडी आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात होऊन दुचाकी स्वार आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला आहे . आणि किशन कथोरे थोडक्यात बचावले आहेत त्यांचा अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक जखमी झाले आहेत घटनेची माहिती कळताच कल्याण तालुका ग्रामीण  पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचारी येऊन पंचनामा केला आहे आणि मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू केली आहे 
          रविवारी दि १३ डिसेंबर रोजी आमदार किसन कथोरे साहेब मतदार संघातील पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून ६.४५ वाजता अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूर कडे येत असताना त्यांच्या गाडीला समोरून बाईकने धडक दिली त्यामुळे मोठा अपघात झाला असून बाईक वरील तरुण तरुणी गंभीर जखमी होऊन त्यांचा त्यानंतर जागी मृत्यू झाला आहे अमित सिंग (२२) आणि सिमरन सिंग (१८) अशी मृतक यांची नावे आहेत . अपघात इतका भीषण होता की फोर्च्युनर गाडीची पुढची बाजू संपूर्ण चाकणा चुर झाली आहे . 
तर भाजपा आमदार किसन कथोरे यांना किरकोळ दुखापत झाली असून अंगरक्षक श्री माळी स्वीय साहाय्यक महेश सावंत सुखरूप आहेत व वाहन चालक किरकोळ जखमी आहेत दरम्यान  कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील गुन्हा दाखल  करण्याची प्रकिया सुरू झाली आहे . अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण तापणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web