कल्याणमध्ये आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरावेचकांचे आंदोलन

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागून साठे नगर आहे. या साठेनगर मध्ये शेकडोंच्या संख्येने कचरावेचक राहतात. गेली ४० वर्षापासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंड मधून ४५० हुन अधिक कुटुंबीय  कचरा वेगळा करीत भंगार जमा करीत हे विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराला कचरामुक्त करण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या विलगीकरण जागोजागी केला जातो, त्यामुळे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड मध्ये कचऱ्याची आवक कमी झाली आहे. सध्या  डम्पिंग ग्राउंड बंद करायचे आहे यामुळे कचरा वेचकांच्या समोर  रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.  येथील कामगारांना व मंजुरांना काही रोजगार देऊन पुनवर्सन करावे या साठी निकिता राव यांच्या नेतृत्व खाली सोमवारी सकाळी आधारवाडी  ड्रम्पिंग ग्राऊंड बाहेर आंदोलन करण्यात आले .

मनपाने सुमारे २७जणांना कचरावेचक म्हणुन ओळखपत्र दिले असुन आज सकाळी शेकडोंच्या संख्येत कचरा वेचक महिला पुरुष आधारवाडी डम्पिंग डम्पिंग ग्राऊंडच्या गेटवर जमा झाले. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या थांबवल्या यादरम्यान पोलीस आणि आंदोलक कचरा वाचकांमध्ये जोरदार झटापट झाली .सध्या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्याच्या काम सुरु झाला आहे मात्र आंदोलनकारी डम्पिंग ग्राऊंडच्या प्रवेशद्वारावर थांब मारून बसले आहे. आंदोलन करता कचरावेचकांची मागणी आहे की कचरा विलगीकरण काम त्यांना मिळाला पाहिजे याकरिता त्यांना रोजगार मिळेल. आता महापालिका याचावर तोडगा कसा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वाभीमानी सामाजिक संघटना ,भीम सेना महाराष्ट्र अध्यक्ष नीतिका राव यांनी ठोस भुमिका मांडल्या, या कचरावेचकांना कचरा प्लाँन्ट येथे कचरा वेचण्याची मुभा मिळावी तसेच कचरावेचकांना मनपाने ओळखपत्र द्यावेत जेणे करून सोसयटी मध्ये जात सुका कचरा वेचित त्या भंगारातुन त्यांच्या रोजगाराला मदत होईल. पालिका आयुक्त यांना या विषयी पत्रव्यवहार करून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त रहिवाशी आणि मजूर महिला नी आंदोलन केले  त्यावेळी पोलिसांत आणि आंदोलन कर्त्यात झटापट  झाली 

                  दरम्यान   कचरावेचकांना कंत्राटी पध्दतीने  कचरा प्लाँन्टवर कामावर घ्यावे. झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत घरे उपलब्ध कचरावेचकांना घरे घ्यावीत. आशा मागण्या भीम सेना अध्यक्ष महाराष्ट्र नितिका राव यांनी  कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांना या आंदोलना निमित्ताने पत्र देत  केल्या आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web