इंधन दरवाढ आणि भाजपचे रावसाहेब दानवे विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन

प्रतिनिधी.

डोंबिवली -दिवसागणित इंधन दरवाढ होत असल्याने महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधा डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेतर्फे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले. मात्र मोर्चा आणि आंदोलन करण्यास पोलिसांची परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.

शिवसेना मध्यवर्ती शाखेतून निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चेकऱ्यांनी शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर ताशेरे ओढण्यात आले. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली महिला जिल्हा सचिव सुधीर पाटील,डोंबिवली शहर कार्यालय प्रमुख सतीश मोडक, शहर संघटक डोंबिवली (पश्चिम) किरण मोंडकर, कल्याण ग्रामीण महिला संघटक कविता गावंड, उपशहर प्रमुख विवेक खामकर,परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, सुदर्शन म्हात्रे, सोपान पाटील, सुधाकर वायकोळे, बाळा म्हात्रे, महिला उपशहर संघटक अल्पा चव्हाण,अनिता मयेकर, सीमा अय्यर, सुनीता जावकर, यांच्यासह महिला आघाडी,युवा आघाडी आणि सैनिकांची उपस्थिती मोठी होती. “भडकले-भडकले पेट्रोल डीझेलचे भाव भडकले, निघाले-निघाले केंद्र सरकारचे दिवाळे निघाले, शेतकरी आहे सकल जणांचा अन्नदाता तोच खरा देवाचा भाग्य विधाता, रावसाहेब दानावेच करायचं काय खाली डोक वर पाय,अशा घोषणांनी पूर्वेकडील इंदिरा चौकात निदर्शने केली.दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. यावेळी राजेश मोरे म्हणाले,केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीमुळे मुलभूत गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या ध्येय धोरणाचा निषेध करीत करतो. यावेळी घरगुती गॅस महाग झाल्यामुळे महिला सैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web