ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ने पकडल्या ८५ लाख ४८ हजार रुपयाच्या बनावट नोटा,तिघाना ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी.

ठाणे – गुन्हे शाखा युनिट 5 यांनी भारतीय चलनातील 85 लाख 48 हजार रुपयाच्या नोटा बाजारात विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिन जणांना अटक केली आहे.ठाणे कापूरबावडी येथे एक इसम बनावट नोटा विक्री साठी येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती, त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी येथे असलेल्या बस स्टॉप च्या समोर साफळा रचून एका संशयित इसमास अटक करण्यात आली त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे बनावट नोटा सापडल्या, त्याच्या कडे चौकशी केली असता, या मध्ये अजून दोन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले,त्या प्रमाणे आरोपी सचिन गंगाराम आगरे वय 29, राहणार कळंबट ता. चिपळूण मन्सूर हुसेन शेख वय 45,राहणार बानमोहल्ला ता चिपळूण चंद्रकांत महादेव माने वय 45 राहणार हकीमजी रुकमानाजी चाळ साकीनाका मुंबई,यांना अटक करण्यात आली, या तिनही आरोपिंकडून 2000 रुपये दराच्या 85 लाख 48 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्या, या नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले संगणक, प्रिंटर, पेपर रिम्स, शाई, कट्रर, स्केल, मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.

यातील मास्टरमाईंड चंद्रकांत महादेव माने वय 45 याचे कोल्हापूर येथे ज्वेलर्सचे दुकान होते, पण करोनाच्या महामारी मुळे आणि लोकडाऊन मुळे त्याचे दुकानात 40 ते 45 लाखाचे नुकसान झाले, हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने दोन हजाराच्या नोटाच छापायच्या ठरवल्या , त्या साठी त्याने दुसरा आरोपी मन्सूर हुसेन खान या इसमाला बरोबर घेतले त्याचे झेरॉक्स चे दुकान आहे, त्यात तो छोटे मोठे प्रीटिंगचे सुद्धा काम करायचा, आणि त्याच्या दुकानात तिसरा आरोपी सचिन आगरे काम करायचा या तिघांनी मिळून कॉम्पुटर, प्रिंटर व इतर साहित्य जमा करून 2000 रुपयाच्या हुबेहूब नोटा छापायला सुरुवात केली, जुलै महिन्यापासून त्यांनी ह्या नोटा छापण्यास सुरुवात केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, आता पर्यंत त्यांनी अशा किती नोटा छापल्या असतील आणि बाजारात किती विक्री केल्या असतील याचा तपास पोलीस करत आहेत, हे तिघेही ठाण्यात राहत नाहीत परंतु नोटांची विक्री करण्यास ठाण्यात येण्याच त्यांचं काय कारण आहे याचा तपास ए पी आय पवार करत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web