उभ्या असलेल्या चारचाकीला दुसऱ्या गाडीची मागून धडक, एक जागीच ठार

प्रतिनिधी.

कल्याण- रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकीला मागून आलेल्या दुसऱ्या चारचाकीने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की रस्त्यावर उभी असणारी गाडी इलेक्ट्रिकच्या पोलवर आदळल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.
कल्याण पूर्वेतील उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी पूलावर रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात घडला. धडक दिलेली गाडी ही उल्हासनगरकडून कल्याणच्या दिशेने येत होती. एक व्यक्ती रस्त्यावर आपली गाडी उभी करून त्याशेजारी थांबली असतानाच भरधाव वेगात आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गाडी शेजारी उभ्या असणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर उभी असणारी गाडी शेजारील इलेक्ट्रिक पोलवर आदळल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमी व्यक्तीला बाहेर काढले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web