मोहोळ पोलिसांची दमदार कामगिरी, पोलिस नाईक शरद ढावरे यांचे पोलिस अधिक्षकांकडून अभिनंदन

प्रतिनिधी.

मोहोळ– पोलिस नाईक शरद ढावरे मोहोळ पोलिस स्टेशन येथे कार्यरत असून त्यांनी व त्यांच्या सहकार्यानी कर्तव्य बजावत असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळल्या होत्या.त्याची नोंद सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेवून त्यांना प्रशस्ती पत्र प्रदान करून अभिनंदन केले आहे.
आपण केलेल्या सेवेचा महाराष्ट्र पोलिस दलाला सार्थ अभिमान वाटतो.भावी काळात असेच उत्कृष्ट कर्तव्य बजावीत राहून महाराष्ट्र पोलिस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल अशी खात्री आहे असे प्रशस्ती पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मोहोळ पोलिस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना चोवीस तासाच्या आत पकडून गेलेला माल हस्तगत करून आरोपीस जेरबंद केल्याने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस नाईक शरद ढावरे,पोकाॅ गणेश दळवी, पांडुरंग जगताप यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.तसेच मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी केलेल्या दमदार कामगीरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मी व माझ्या सहकार्यानी केलेल्या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आमचा विशेष सन्मान केला आहे.केलेल्या कामाची दखल घेऊन प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.त्याबद्दल त्यांचा ॠणी आहे.येणार्या काळातही सर्व पोलिस मित्र सहकार्यांच्या मदतीने आणखीन चांगले काम करून कामातूनच धन्यवाद व्यक्त करीन. असे शरद ढावरे,पोलिस नाईक, मोहोळ पोलिस स्टेशन यांनी सागितले. प्रशस्ती पत्र मिळाल्याबद्दल कामाचे कौतुक करून पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web