प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीबाबत मंत्रालयात बैठक

प्रतिनिधी.

मुंबई – माणगाव तालुक्यातील जावळी येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीसाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने मौजे जावळी, ता. माणगांव येथील गट क्र. 73 क्षेत्री 9.12.00 हे.आर. मधील 2.00.00 हे.आर. जागा उप प्रादेशिक परिवहन कर्यालय, पेण यांनी ब्रेक टेस्ट ट्रॅक व इमारतीसाठी महसूल मुक्त सारामाफीने हस्तांतरण करण्यास मंजूरी दिलेली आहे.

या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडून 250 X 6 मीटर्स आकाराचा ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणे, भूखंड विकसित करणे, आवार भिंतीचे बांधकाम, बांधीव गटार बाधंकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅक व्यतिरिक्त उर्वरीत जागेत पेव्हरब्लॉक पार्किंग बांधकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था, विद्युतीकरण व अनुषंगिक बाबींवर या बैठकीदरम्यान चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री कु. तटकरे यांनी ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी आवश्यक सुविधांसह अंदाजपत्रक त्वरित तयार करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच अंदाजपत्रक तयार करताना आधुनिक पद्धतीने स्वयंचलित वाहन तपासणी व प्रमाणपत्र म्हणजे आयएनसी सेंटर उभारणीबाबतही अंदाजपत्रकात उल्लेख करावा, असेही यावेळी सांगितले.

या बैठकीसाठी परिवहन उपायुक्त अभय देशपांडे, परिवहन विभागाचे अवर सचिव श्री.कदम, उप विभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण श्रीमती उर्मिला पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web