कल्याण पूर्वेत कचऱ्यात आढळून आले नवजात बालक,कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पूर्वेतील आमराई मध्ये नवजात बालक कचऱ्यात आढळून आले आहे. हे पाऊल अनैतिक संबंधातून की आर्थिक चणचणीतून उचलले याचा तपास पोलीस करीत आहे कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा.द.वी कलम ३१७ दाखल करून आरोपींचा शोध पोलिसांनी  केला आहे.                              

जगवायचं नाही तर,पैदा का करता ” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे बुधवारी आमराई कल्याण पूर्व मध्ये एक नवजात मुलाला कचऱ्यात फेकून दिले, त्यामुळे परिसरात एक  खळबळ माजली आहे . २१ व्या शतकात कुटूंबियातील स्त्री किंवा माता अशी माणुसकी आणि मातृत्व विसरून समाज कोणत्या दिशेने जात आहे खरं विचार करण्याची गरज या घटनेतुन समोर आली आहे .दरम्यान रडण्याचा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी व अनंता गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस स्टेशन ला कळवून बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे,बाळाची प्रकृती स्थिर आहे,,सदर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे,परंतु हे अस कधी पर्यंत चालणार असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे आणि ज्याने कोणी हे कृत्य केले आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web