डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग

कल्याण – डोंबिवलीतील सोनारपाडा भागात एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. यात भंगार सामान जळून झाले आहे.ही आग लागल्या मुळे होणाऱ्या स्फोटा मुळे अफरातफरी माजली होती.या होणाऱ्या स्फोटा मुळे आजू बाजूच्या राहिवाश्यना सुरक्षित स्थळी  हलविण्यात आले होते.
                       डोंबिवली पूर्वेतील बुधवारी दुपारच्या सुमारास सोनारपाडा भागात असलेल्या या भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. आग लागल्याने केमिकल ड्रम फुटून मोठे स्फोट होता असल्याने नागरिक सैरावैरा पळत सुटल्याचे चित्र या वेळी दिसून आले. ही आग विझविण्या साठी आगीचे चार बंब आग विझविण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले.
   ही भीषण आग लागल्या मुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.येथे व भंगार गोदामे असल्याने या सोनारपाडा परिसरात नेहमीच आग लागत असल्याचे दिसून येते.ही गोदामे मानवी वस्ती जवळ असल्याने या परिसरात नेहमीच आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची भीती येथील रहिवाश्याना सतावत असते. त्यामुळे निवासी भागात असे धोकादायक व्यवसाय दूर ठेवावे नाही तर तो दिवस दूर नाही की दुर्घटना घडवून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी घडेल यात कुठलेही दुमत नाही.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web