दृष्टीहीन युवकाचा सायकल प्रवासाचा विक्रम

प्रतिनिधी.

अमरावती – जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून विक्रम स्थापीत केला आहे. त्यांच्या विक्रमाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. यशोमती ताई ठाकूर, जिल्हाधीकारी शैलेश नवाल साहेब,आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत वानखडे, राजकुमार पटेल ,जितू ठाकूर,सोसायटी अध्यक्ष यावली शहीद येथील पंकज देशमुख,सागर देशमुख, हरीषजी मोरे , आर्मी एक्स मँन व आयन बॉल चे विदर्भ प्रभारी वैभव पवार, पत्रकार राजेंद्र ठाकरे,साप्ता. साधनाराज वृत्तपत्राच्या संपादिका कंचनताई मुरके, समाजसेवक विशाल पवार यांच्या उपस्थितित जंगी स्वागत  करण्यात आले.

अजय लालवाणी एक पंचविशीतला युवक जन्मापासून अंध असून विविध क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य ते दाखवीत आहेत. बृहन्मुंबई येथील महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नोकरीला असलेल्या अजय लालवानी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टीहीन व मूकबधीरांच्या जागतिक ज्युडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जून २०१९ मध्ये  हिमालयातील ‘फ्रेन्डशिप पीक’ व ऑगस्ट २०१९ मध्ये ‘माऊंट युनुम’ ही शिखरे पादाक्रांत केली. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई-गोवा हे १२०० किमी अंतर सायकलने सात दिवसात पार केले.  सलग दोन वर्षे जलतरण स्पर्धेत राज्य व विभागीय पातळीवर ‘फ्री स्टाईल’, ‘ब्रेस्ट स्ट्रोक’ व ‘बटरफ्लाय’ प्रकारात पदके जिंकली. दिव्यांगांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, व तीन खुल्या मॅरेथॉन शर्यतीत त्यांनी भाग घेतला आहे.    दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात मागील चार वर्षापासून मल्लखांबाचा सराव करीत आहे. आता मुंबई ते गोंदिया व परत हे २०१० किमी अंतर सायकलवरून १२ दिवसात पार करण्यासाठी सिद्ध झाला आहे.

गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२० रोजी पहाटे चार वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील श्री समर्थ व्यायाम मंदिरासमोरून त्याची ही ऐतिहासिक सायकल दौड सुरु झाली होती. त्याला प्रा संदेश चव्हान रत्नागीरी आयन बॉल अंबासिटर  गोपीनाथ आरज (४१), भगवान पाटील (३५)दापोली ल,राजे स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रक्षिक्षक प्रा.संदेश चव्हाण(३२),प्रा.प्रशांत देशमुख (३५), प्रथमेश अडवडे (२०),निरंकार पगडे(१३), मंदार पाटील (१८), गणेश सोनावणे (२२), रितिक कासले (१८),  अण्णासाहेब घुमरे (४९) ही मंडळी साथ देत आहेत. दररोज सुमारे १७० किमी अंतर पार करून वाटेत नाशिक, धुळे, दाताले, अमरावती, व नागपूर या पाच ठिकाणी तो रात्रीची विश्रांती घेईल. दि. ८ डिसेंबर २०२० रोजी गोंदिया येथे पोचून दि. ९ डिसेंबर २०२० रोजी तो परत निघेल व याच मार्गाने दि. १४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी मुंबईस परत येईल. हे शिवधनुष्य उचलण्यामागचा त्याचा उद्देश स्पष्ट आहे. ‘माझ्या दिव्यांग मित्रांनीही पुढे येऊन असे उपक्रम करून बघावेत, त्यात सहभागी व्हावे , तुमची चिकाटी व तुमचे धैर्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही, उलट तुम्हाला दुप्पट सामर्थ्य देते हे, आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे.’ ‘गेले आठ महिने सतत जाणवणारी अव्यक्त भीती, अनिश्चितता व चिंता यावर मात करण्यासाठी शासनाचे सर्व निर्बंध पाळून अत्यंत जबाबदारीने आखलेली ही साहसी मोहीम करोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी केवळ माझ्या दिव्यांग बांधवांनाच नव्हे तर इतरही सर्वांनाच एक नवी उमेद, उत्साह व उभारी देईल’ असा विश्वास त्यांनी सत्कारानंतर बोलतांना दिला. अजयचे पुढचे स्वप्न ऑक्टोबर २०२१ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे ३७०० किमी अंतर सायकलवरून २५ दिवसात पार  करण्याचे आहे. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठीही याची नोंदणी करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगीतले.

या प्रसंगी अमीत पवार, युवा संवाद प्रतिष्ठान चे समस्त पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web