अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन

प्रतिनिधी.

अमरावती – सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा असे आवाहन करण्यात आले होते या भारतबंदला अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणावर उत्फुर्त प्रतिसाद मिळाला, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी येथे शेतकरी पुत्रांनी रस्त्यावर येत तासभर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

तर भीम ब्रिगेडचे वतीने अमरावती शहरातील महादेव खोरी जवळच्या बाय पास वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले,यावेळी भीम बिग्रेटच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर झोपून ये जा करणारी वाहने अडविले,शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर झोपून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करतांना दिसून आले,यावेळी कृषी कायदा व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले अमरावती शहरात संमिश्र व ग्रामीण भागात कडकडीत बंद दिसून आला,एकूणच अमरावती जिल्ह्यात भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष ,शेतकरी संघटना रस्त्यावर उतरले होते

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web