प्रतिनिधी.
डोंबिवली – शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत शेतमालाला किमान हमी भावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे, बाजार भाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्या चा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तात्काळ 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या इतर मागण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये समर्थन देण्यासाठी डोंबिवली शहरांमध्ये इंदिरा चौक डोंबिवली पूर्व याठिकाणी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष सुरेंद्र ठोके,क.डो.जिल्हा संघटक मिलिंद साळवे, उपाध्यक्ष राजु काकडे, अशोक गायकवाड, ठाणे जिल्हा सचिव रेखाताई कुरवारे,बाजिराव माने, रामकिसन हीगे, संतोष खंदारे, योगेश सुतार, संजय गौतम, आगळे साहेब, गोगलताई मंगे, यासह अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
