कल्याण पुर्वेतील धक्कादायक घटना, राग झाला अनावर जन्मदाता बाप झाला हैवान

प्रतिनिधी।

कल्याण– कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात राहणारा एका सहा वर्षीय मुलासोबत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे की, जो ऐकून आणि पाहून मन सुन्न होईल. या परिसरात राहणा:या सचिन कांबळे याच्या सहा वर्षीय मुलाला पायाच्या मांडीवर आणि पाश्र्वभागावर मोठय़ा जखमा झाल्याचे मुलांच्या नातेवाईकांनी पाहिल्या. या संदर्भात त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता मुलाने सांगितले की, त्याला बापाने मारले आहे. मुलासोबत असा का प्रकार केला याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या महिलेला सुद्धा मुलाच्या बाप सचिन कांबळे याने दमदाटी केली आणि पिटाळून लावले. ही महिला मुलाला घेऊन कोळसेवाडी  पोलिस ठाण्यात आली. मुलासोबत मुलाच्या अंगावरील चटके पाहून पोलिस ही हवालदील झाले. आणि तात्काळ निर्दयी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले  कल्याण पूर्वेतील विजयनगर मध्ये संतापजनक घटना घडली आहे . नकळत बाप जेवत असताना चुमुकल्याने लघुशंका केल्याने राग इतका अनावर झाला की त्या मुलाचे आपण जन्मदाते आहोत याचा विसर पडला.           

कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांच्या म्हणण्यानुसार ,  सदर व्यक्ती सचिन कांबळे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. मुलाने जेवण जेवताना लघूशंका केली. याचा  राग मनात ठेवून त्याने घरातील चमचा गरम केला आणि मुलाला चटके देऊन जखमी केले. तसेच मारहाणही केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सचिन कांबळे याची तीन लग्ने झालेली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृ्त्यूनंतर दुस:या पत्नीचाही मृत्यू झाला. दुस:या पत्नीकडून हा लहान मुलगा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाची आई नाही म्हणून कुठलाही धाक न राहिलेल्या बापाने रागांच्या भरात इतक्या टोकाचे पाऊल उचलावे की त्याच्या कोवळ्या शरीरावर तप्त गरम चमच्याने चटके द्यावे. नात्याला काळिमा फासणारी घटना आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web