प्रतिनिधी.
डोंबिवली – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२० रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला आवाहन केले होते की दादर चैत्यभूमी या ठिकाणी महामानवाला वंदन करण्यासाठी कोरोना समयी कुणीही न जाता आपण राहतो त्या ठिकाणीच महामानवाला वंदन करण्यात यावे.
या त्यांच्या आवाहना नुसार वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने डोंबिवली शहरांमध्येच महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोंबिवली शहरामध्ये अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यांप्रसंगी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके,क.डो.जिल्हा संघटक मिलिंद साळवे, उपाध्यक्ष राजु काकडे, भारतीय बौद्ध महासभेचे डोंबिवली शहर अध्यक्ष गौतम सुतार, अशोक गायकवाड, अर्जुन केदार, बाबासाहेब घुगे, गणेश गायकवाड,विजय इंगोले, योगेश सुतार, रामकिसन हीगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.