अंजलीताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५०० सफाई कामगार महिलांचा शाल देऊन सन्मान

प्रतिनिधी.

सोलापूर – वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा वाढदिवस प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर ,बुधवार पेठ येथे केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या 500 महिला सफाई कामगारांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शाली वंचित बहुजन आघाडीच्या महिला महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अंजनाताई गायकवाड, व नगरसेविका ज्योतीताई बमगुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका कोषाध्यक्ष बबन शिंदे महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला युवा नेते गौतम महाराज चंदनशिवे अनिरुद्ध वाघमारे विनोद इंगळे विठ्ठल पाथरूड विजयनंद उघडे सचिन शिराळकर चाचा सोनवणे रवी थोरात अण्णासाहेब वाघमारे, अँड.विशाल मस्के अँड.मालिक कांबळे विजय बमगुंडे, सुजाता ताई वाघमारे मंदाकिनी शिंगे धम्मरक्षता कांबळे हेमा अनिरुद्ध वाघमारे पल्लवी सुरवसे पुष्पा गायकवाड फुलावती काटे उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सूत्रसंचालन गणेश पुजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजाताताई वाघमारे यांनी केले. सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते व महिला सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web