डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी प्रदूषणाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहिली आहे. येथील अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणा मुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच्यातच प्रदूषणाच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. केमिकलच्या पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते गुलाबी होण्याची घटना काही महिन्यान आधी घडली होती. आता पुन्हा एकदा केमिकल मिश्रित निळे पाणी रस्त्यावर सोडल्याचे दिसून आले.त्यातून मोठ्याप्रमाणात परिसरात दुर्गंधी सुटली असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले.अधिकारीही या समस्येकडे लक्ष देत नसल्याने आता अधिकाऱ्यांना धुतल्यावरच हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून डोंबिवलीतील प्रदूषणाकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं लक्ष वेधलं आहे.
डोंबिवली एमआयडीसीत प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नेहमी असते. काही महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. स्वतः पाहणी करून प्रशासनाला आणि कंपनी मालकांना ताकीद देऊन सूचना केल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये कंपन्या सुरू झाल्यानंतर परत केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे,
एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रकार घडत आहे. एमआयडीसी परिसरातील कल्याण-शीळ रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर निळ्या रंगाचे पाणी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रसायन मिश्रित पाण्यातून चालताना त्वचेचे आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. अस आजच्या घडणे वरून दिसून येत आहे.