भीषण अपघातात वंबआ जिल्हाध्यक्ष व चार जनाचा मृत्यू

प्रतिनिधी.

बीड – वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. लातूरहुन औरंगाबादकडे जात असतानाहा अपघात झाला. समोरून येणाऱ्या टॅंकरला कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गाडीची पुढील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. यावेळी गाडीतील वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व त्यांचे नातेवाईक सुभाष भिंगे तसेच महादेव चकटे, व्‍यंकटी गडदे यांचा या अपघातात मृत्यू झाला तर राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आज सकाळी सदाशिव भिंगे हे लातूरहुन औरंगाबाद कडे जात असताना गेवराई जवळ पावणे नऊ वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला. रस्ता सोडून गाडीने समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बीडचे वंचितचे प्राध्यापक शिवराज बांगर, गेवराईचे तालुकाध्यक्ष सुभाष सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. आज संविधान दिनी देशात जल्लोष असताना वंचितचा एक धडाडीचा कार्यकर्ता अशाप्रकारे काळाच्या पडद्याआड होणे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web