प्रतिनिधी.
नेवासा – संविधान दिनानिमित्त आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी आंबेडकर चौक ,नेवासा फाटा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुक्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुल हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांनी सामूहिक संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. बहुजन समाजस आपल्या हक्कसाठी संविधान वाचवणं किती गरजेचे आहे. यावर थोडक्यात मत मांडण्यात आले. त्याचं बरोबर तालुक्यातील विविध कार्यालयात संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात आल्या .
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शाहिदाना आदरांजली वाहण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुमित मकासरे, नेवासा वंचित बहुजन आघाडीचे विकी बनकर,सचिन खरचंद, देविदास बर्वे, शत्रुघन गोरे, संदीप विधाटे,सुमित रोकडे व इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

