महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीच्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण

प्रतिनिधी.

मुंबई -कोरोनाने विषाणूनेपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, लोकाच्या आरोग्याची खबरदारी म्हणून चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणला करण्याची सोय करण्यात येणार आहे. दरवर्षी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर उसळत असतो, पण या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापरिनिर्वाणदिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे असे आवाहनही सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे प्रमुख वाहिन्यांवरून तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. नागरिकांना घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web