कल्याण मध्ये सोनाराच्या दुकानांवर दिवसाढवळ्या दरोडा

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पूर्वेतील नांदीवली मध्ये दागिन्यांच्या दुकानांवर दिवसाढवळ्या चोरांट्यांनी दरोडा टाकत तब्बल १६ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे . हा दरोडा सणासुदीच्या दिवशी पडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचे चित्त थरारक कृत्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे कोळसेवाडी पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लावली आहे .

कल्याण पूर्वेतील  नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात भर दिवसा दरोडा टाकण्यात आला. दुकानातील कर्मचाऱ्याला दराेडेखाेराने जखमी केले. तरी सुद्धा त्याने एका दरोडेखोराला पकडले आहे. मात्र दोन लूटारू ३० तोळे सोने व दीड लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. संपूर्ण घटनाचा चित्त थरारक कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. लूटारूंनी रिव्हॉल्वर चा धाक दाखवत हि लुट केल्याची प्राथमिक माहिती आहे. 
दरम्यान  कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी  तपास  सुरू  केला आहे.  सणासुदीचा फायदा घेत चोरटय़ांनी डाव साधला असल्याचे दिसत आहे. कल्याणपूव्रेतील नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात सोमवारी ता .१६ साडे तीन वाजताच्या सुमारास तीन चोरटे आले. त्यांनी दुकानात लूटपाट सुरु केली. दुकानात असलेल्या कर्मचाऱ्याला तीक्ष्ण हत्याराने जखमी केले. लूटपाट सुरु केले. दाेन लुटारु दुकानातील ३०  ताेळे दागिने आणि एक लाख ६० हजाराची रोकड पसार झाले. झटापटीत मात्र दुकानातील कर्मचारी रुपाराम चाैधरी जखमी हाेऊन सुद्धा एका चाेरट्याला पकडून ठेवले. चित्त थरारक  संपूर्ण घटना सीसी टीव्हीत कैद आहे.  तीन पैकी दोन दरोडे खोर संधीचा फायदा घेत पळून गेले. आजूबाजू लोकांना या चोरटय़ाला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. साडे तीन वाजताची घटना आहे. या प्रकरणात अद्याप दोन दरोडेखोर फरार असून लवकरात लवकर त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web