माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई– मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना कळविण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना इयता १० वी व १२ वी मध्ये जास्तीत जास्त गुण (९० टक्के व त्यापुढे) मिळालेले आहेत किंवा विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य केलेले आहेत. अशांनी विशेष गौरव पुरस्कार पात्रतेनुसार एकरकमी रु. १० हजार व रु. २५ हजारासाठी आवश्यक कागदपत्रांसह (मूळ गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्र असल्यास) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे अर्ज करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,मुंबई शहर विद्या वी.रत्नपारखी, यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web