प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे १ एप्रिल पासून सुरू असलेल्या टाटा आमंत्रा कोवीड सेन्टर मध्ये दिवाळी धनत्रयोदशी निमित्ताने २५ हजार कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या कोवीड फायटर योध्दांचा मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनपा प्रशासनाने कंत्राटी पध्दतीने डॉक्टर, वार्डबाय्,नर्स, यांंची भरती करून कोरोना काळ सुरू झाल्यापासून रूग्ण सेवा करीत आहे. आशा कोवीड फ्रन्ट फायटर यांनी केलेल्या रूग्णसेवा कामामुळे त्यांच्या पाठीवर कैतुकांची थाप देत शुक्रवारी आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धनत्रयोदशी निमित्ताने आयोजित या क्रार्यक्रमाच्या प्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग आधिकारी डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता घनश्याम नंवागुळ , उप अभियंता प्रमोद मोरे, अभियंता, दिलीप ठाणेकर, टाटा आमंत्रा कोवीड सेन्टर इनचार्ज डॉ. दिपाली साबळे मोरे, उपस्थित होते.

