बापाचा बाप या साप्ताहिकाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन

प्रतिनिधी.

भिवंडी – साप्ताहिक म्हटले म्हणजे अमावस्या पौर्णिमेला निघणारे वृत्तपत्रे असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो परंतु या सर्व गोष्टीला तिलांजली देण्याचे काम साप्ताहिक बापाचा बापने केले असून गेल्या ९ वर्षांपासून सातत्य ठेवून अखंडितपणे भिवंडी सह ठाणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या बापाचा बाप या साप्ताहिकाचा ९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात भिवंडी पूर्वचे कार्यसम्राट आमदार रईस शेख यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.

बापाचा बाप या साप्ताहिकाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन रिपाइ सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अँड. किरण चन्ने, भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती ५ चे सभापती फराज (बाबा ) बहाउद्दीन, बॉम्बे मर्कंटाईल बँकेचे एजीएम सलिम शेख, भिवंडी मनपाचे शहर अभियंता एल. पी. गायकवाड, सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी ना.पा. जाधव, काटई ग्रामपंचायतच्या सरपंच नीता जाधव, भिवंडी मनपा जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे, रिपाई ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक बी. के. गायकवाड, भिवंडी वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी, ग्रंथपाल तेजराव तायडे, पत्रकार नितीन पंडित , प्रशांत देशमुख , अँड. मुकेश नवगीरे, अँड. संदेश गायकवाड, पुरस्कार प्राप्त सूत्रसंचालन व निवेदक शशिकांत चव्हाण, संपादिका रेणुका चव्हाण, कार्यकारी संपादक संतोष चव्हाण यांचेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितित पार पडले .यावेळी शुभेच्छा देताना सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी ना पा जाधव म्हणाले की, पेपरच शीर्षक आहे त्यात खूप रहस्य आहे. तुम्ही तुमच्या पेपर मध्ये काय प्रकाशित करता यावरच तुमच्या पेपरच भवितव्य अवलंबून असते. वाचकांना जे हवे आहे ते जर वृत्तपत्रात मिळाले तर त्या वृत्तपत्राचे वाचक कमी होत नसतात आणि ते काम बापाचा बाप करत असल्याचे सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी ना.पा. जाधव यांनी बोलताना सांगितले.

रिपाई सेक्युलर चे महाराष्ट्र सरचिटणीस अडव्होकेट किरण चन्ने यांनी शुभेच्छापर बोलताना सांगितले की, हल्ली मीडिया ही जातीयवादी होत चालली आहे, त्यामुळे प्रबोधन कमी होत असून वेगळेच बघावयास व ऐकावयास मिळत आहे, परंतु बापाचा बाप ने सामाजिक भान ठेवून एक चांगली भूमिका घेण्याचे काम केले आहे म्हणून जेव्हा ठाणे जिल्हामध्ये फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचा, प्रबोधनाचा आणि क्रांतीचा इतिहास लिहिला जाईल, आणि त्यामध्ये ज्या, ज्या वृत्तपत्रानी चळवळीला पूरक असे लिखाण करून आपला सहभाग दर्शविला असेल त्याचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल तेव्हा अग्रक्रमाने नक्कीच बापाचा बाप साप्ताहिकाची दखल लिहणाऱ्यांना घ्यावी लागेल. असे रिपाइ सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अँड.किरण चन्ने यांनी बोलताना सांगितले. यावेळी वकील, इंजिनिअर,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कवी, साहित्यिक, भिवंडी मनपाचे अधिकारी व कर्मचारी, बापाचा बाप साप्ताहिक प्रतिनिधी परिवार व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web