प्रतिनिधी.
अकोला – वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आज हॉटेल सेंट्रल प्लाझा अकोला येथे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत विभागानिहाय बैठक घेऊन बांधणी करण्याची जबाबदारी प्रदेश पदाधिकारी ह्यांना देण्यात आल्या.
वंचितची युवा प्रदेश कार्यकारणी गठना नंतर पहिलीच बैठक आज अकोलयात आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीस एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.युवा आघाडीची कालबद्ध बांधणी आणि आगामी जिल्हा तालुका, महानगर ह्या सर्व कार्यकरण्याचे गठन करण्याबाबत एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सखोल मार्गदर्शन केले.युवा आघाडी बांधणीचा आराखडा प्रदेश च्या वतीने नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांनी मांडला.२३ नोव्हेंबर २०२० पासून प्रदेश कार्यकारणी सांगली सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर ह्या सहा जिल्ह्याचा दौरा आखण्यात आला आहे.त्याकरिता सांगली सातारा ह्या जिल्ह्याची जबाबदारी प्रदेश पदाधिकारी एड सचिन जोरे ह्यांना तर पुणे पिंपरी चिंचवड ह्या जिल्ह्याची जबाबदारी प्रदेश पदाधिकारी ऋषिकेश नांगरे पाटील तर कोल्हापूरची जबाबदारी प्रदेश पदाधिकारी विश्वजीत कांबळे आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी प्रदेश पदाधिकारी विशाल गवळी ह्यांना देण्यात आली.
त्यानंतर दिनांक ७ डिसेम्बर २०२० पासून औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्याचे दौरे सुरु होतील.ह्या जिल्ह्याची जबाबदारी प्रदेश पदाधिकारी अंकुश वेताळ (औरंगाबाद – जालना जिल्हा ),प्रदेश पदाधिकारी रविकांत राठोड (उस्मानाबाद- लातूर जिल्हा),प्रदेश पदाधिकारी चेतन गांगुर्डे (परभणी- नांदेड जिल्हा), प्रदेश पदाधिकारी अक्षय बनसोडे (बीड आणि हिंगोली जिल्हा) ह्यांना देण्यात आली.सोबतच ऑनलाईन सभासद मोहीम सुरु करण्याचे नियोजन देखील करण्यात आले.
युवा आघाडीच्या सर्व जिल्हा तालुका ग्रामशाखा, महानगर आणि इतर सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्याचा आणि नव्याने नियुक्त्या करण्याचा निर्णय प्रदेश कमिटीने घेतला.त्यामुळे कुणीही भारिप किंवा वंचितच्या नावाने माजी पदाधिकारी म्हणून कार्यक्रम आंदोलन करू नये, असेही ठरविण्यात आले.आदिवासी म्हणून ज्यांचे जात प्रमाणपत्र सरकारने अमान्य केले आहे, त्यांची सेवा समाप्ती ३१ डिसेम्बर रोजी होणार असल्याने ह्या जागा आदिवासी समूहाला घेण्यात यावे, ह्या मागणी साठी युवा आघाडी आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहे.शिवाय एमपीएससी च्या परीक्षा सरकारने स्थगित केलया असून मराठा आरक्षणाच्या १६% जागा वेगळ्या काढून उर्वरित जागा तातडीने भरण्याची मागणी करण्यासाठी देखील युवा आघाडी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.
ह्या बैठकीला प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश पदाधिकारी एड सचिन जोरे, ऋषिकेश नांगरे पाटील, शमीभा पाटील, चेतन गांगुर्डे, अक्षय बनसोडे, विशाल गवळी, अंकुश वेताळ, विश्वजित कांबळे आणि सूचित गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीचे संचालन प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी तर प्रास्ताविक युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांनी केले.